चार आठवड्याच्या छोट्याशा मायदेश भेटीत नॅशनल पार्क हे टॉप लिस्टवर होतं पण कडाक्याचं ऊन आणि सोबत कुणी नसल्यामुळे प्रत्यक्ष जायला शेवटचा रविवार उजाडला. अर्थात SGNP ला जायला मी कधीही तयार असते.
साधारण साडे-सातला गेटवर राकेश आणि अर्चित भेटणार होते आणि आयत्यावेळी अर्चितचा मित्र अभिषेकही येणार असल्याचं कळलं.अर्थात त्याच्यासाठी न थांबता अर्चितने गाडी वेळेत आत घेतली हे बरं झालं.आता फ़क्त नेहमीसारखं तडक कान्हेरी की आणखी कुठे हे ठरायचं होतं. पण घाईगडबडीत आखलेल्या दौर्यात हा प्रश्न त्या दिवसाचं भविष्य जसा दिवस पुढे जाईल तसंच ठरतं.गप्पा मारत मारत गाडी पुढे जात होती आणि आम्ही जुन्या भटकंतीच्या आठवणीत रमत होतो.इथेच कुठे एका मचाणावर जायचो असं म्हणायला आणि गाडी कल्वेट नं. ६५ कडे पोहोचायला एकच गाठ पडली. मग काय आजचा पहिला डेरा तिथेच टाकायचं तिघानुमते ठरलंच.
डावीकडून आत जाणारी पार्कातल्या असंख्य "चलो, अंदर जाते है" कॅटेगरीतल्या अनेक पार्कवाटांपैकी ही वाट तशी बरीच मोठी आहे.सरळ फ़ॉलो केलीत तर मागुन मोराच्या माचीवरुन सरळ हायेस्ट पॉइन्टलाही जाता येतं असं म्हणतात. अर्थात त्याची शहानिशा करण्यासाठी आज तितका वेळ नव्हता हेही खरं.
आत येईस्तो जंगल बरंच शांत वाटत होतं. कदाचित उकाड्यानेही पाखरं चिडिचिप असावीत असं वाटुन काही दिसेल या अपेक्षेत आम्हीही नव्हतो.तरी आज नशीब भलतंच जोरावर होतं. गेल्या गेल्याच रॅकेट टेल्ड ड्रोंगोची (पल्लवपुच्छ कोतवाल हे चितमपल्लींच्या पुस्तकातलं त्याचं मराठी नाव छानच आहे नाही?) एक जोडी समोरच्याच झाडांवर पाठशिवणीचा (उर्फ़ पटवापटवीचा) खेळ खेळत होती. त्यांना दुर्बिणीतुन नीट न्याहाळतोय तोच डावीकडे खसखस ऐकु आली आणि झाडांवरतीही बरीच हालचालही दिसली. Red Whiskered Bulbul लगबगीत होते. दूरवर Indian Cuckoo ची सादही सुस्पष्ट ऐकु येत होती.
पुढे डावीकडे वाटेबरोबर वळलो तशी आमच्या आठवणीतलं मचाण तसंच उभं होतं आणि समोरच पाण्याचा छोटासा साठा पुर्वी या डुगडुगत्या मचाणावर चढल्याचं राकेशला आठवण करुन देत होता. आता बहुधा इथे नवं मचाण येत असावं. जवळच एक कोरा सांगाडा कामगारांची वाट पाहात झोपला होता. इथे बार्बेटचा आवाजही येत होता आणि थोड्याच वेळात त्याचेही जवळून दर्शन झाले.
थोडा वेळ ककुचा आवाज ऐकुन मग पुन्हा मागे वळून थोडंवर जाऊया असं ठरलं पण अर्चितचा जीव अभिषेकसाठी कासावीस झाल्याने तो एकटा परत गेटवर जाय़ला निघाला आणि मी व राकेश थोडं पुढे जाऊन परत यायचं ठरलं. तो निघतोय तितक्यातच राकेशने आमच्या सगळ्यात लाडक्या पक्ष्याच्या मादीला पाहिलं आणि अर्चितलाही पाय वळवावे लागले.Paradise Flycatcher ची मादी साध्या डोळ्यांना दिसेल अशी तिरप्या झाडावर बसली होती. तुम्ही आता नराला शोधा असं सांगुन अर्चित पळाला त्यामुळे आम्ही थोडं चढायला सुरुवात केली.
खरंच तो देखणा नर दिसला तर बरं होईल अशा विचारात होते तोच समोरच्या बाजुने डावीकडून उजवीकडे पळापळ झाली आणि दोन बार्किंग डिअर पळताना ओझरते दिसले. म्हणजे मघाशी त्यांचीच खसखस झाली होती वाटतं?
थोड्या वेळाने पुन्हा ख्यॅक ख्यॅक आवाजाने सतर्क झालो पण त्या बार्किंग डियरने आपल्या मित्रांच्या पाठी जायच्या ऐवजी रेंगाळणं पसंत केलं.तोवर हनुमान लंगुरही अलार्म कॉल देत होते त्यामुळेही ते जागरुक झालं असावं. मात्र आत आत जाताना सुकलेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्यांमुळे मात्र आम्ही त्या छोट्या पिलाला स्पष्ट पाहू शकलो.
अजुन थोडं वर जाताना आणखी एक फ़िकट भगव्या रंगाची पक्ष्यांची जोडी डावीकडे उडाली पण ते काय असावं कळणं शक्य नव्हतं. आता आम्हीही बर्यापैकी वर आलो होतो. आमच्यातली उरलेली जोडीही आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून आता आणखी वर जायच्या ऐवजी खाली उतरायचं ठरवलं.
खाली उतरताना मटका लागल्याप्रमाणे पक्षीगण दिसले. राखी धनेशाची जोडी उडून कान्हेरीच्या जवळ जात होती.तर हाकेच्या अंतरावर गोल्ड फ़्लेम्ड आणि आणखी एक वुडपेकर झाडाला फ़ेर्या मारत होते.हिरवेकंच क्लोरोप्सिस राकेश असला की अपॉइंटमेंट घेतल्यागत भेटतात आणि वाटेबरोबर सोबत करतात तसंच आजही झालं. आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्याने सुर्यप्क्ष्यांची लगबगही न्याहाळता येत होती. शिक्राही कुणा पक्ष्याच्या पाठी लागत आमच्या डोक्यावरुन उडून गेला.
अर्ध्या वाटेवर अर्चित-अभिषेक भेटल्याने पुन्हा एकदा थोडं वर-खाली केलं यावेळी पुन्हा धनेशाची जोडी आणि Crested Serpent Eagle चा चित्कार कानावर आला. पुन्हा एकदा गाडीने कान्हेरीच्या पायथ्याशी गेलो पण या पार्कवाटेवर इतकं पाहुन झालं होतं की आज गुंफ़ांपर्यंत जायचं कुणीच नाव काढलं नाही आणि एकमेकांनी आणलेला खाऊ गट्टम करता करता पार्कवाटेचंच कौतुक परतीच्या वाटेवर होत राहिलं.
Showing posts with label संजय गांधी नॅशनल पार्क. Show all posts

Tuesday, May 25, 2010
Tuesday, March 30, 2010
रानभूल...
’रानभूल’ हा शब्द आजवर अनेक जंगलाबद्दल लिहिलेल्या बर्याच खर्या आणि कल्पित कथांमध्ये भेटलाय..पण त्याआधी भेटलंय ते त्यातलं गडद, किर्र करणार जंगल....त्यामुळे आपण हा प्रकार फ़क्त पुस्तकातच अनुभवणार किंवा खरं तर असं काही नसेल अशा काही भाबड्या समजुतीत असतानाच एका मान्सुनमध्ये बी.एन.एच.एस.चा सिलोंडा ट्रेल जाहिर झाला...बी.एन.एच.एस.वाले प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी सिलोंड्यात घेऊन जातात त्यामुळे इतर वेळी वनखात्याच्या परवानगीशिवाय न जाणार्या विभागात जायला मिळतं शिवाय पावसाळ्यात सिलोंडयातले तिन्ही ओढे मस्त वाहात असतात, सगळीकडे गर्द हिरवाई पसरली असते आणि एकुण काय आपण मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात उंडारतोय याचा नामोनिशान नसतो...
आतापर्यंत बी.एन.एच.एस.चे जवळजवळ सगळे गाईड निदान चेहर्याने तरी माहित झालेत किंवा थोडी मस्ती करता करताही सिरियसली बर्डिंग करणारा आमचा ग्रुप त्यांना माहित झाला आहे..काही का असेना ट्रेलच्या वेळी थोडी मुभा मिळते...म्हणजे थोडं इथे-तिथे उंडारलं तरी चालतं त्यावेळची ही गोष्ट आहे.....
आता आपण सिलोंड्यात काय नेहमीच येतो या मस्तीतच त्या दिवशी ओढा नं.२ पार केल्यावर जयेशच्या डोक्यात दुर्बुद्धी सुचली...(असले उद्योग करून गोत्यात आणायचं घाऊक कंत्राट त्याच्याचकडे आहे म्हणा...) "अरे आजचा ग्रुप (म्हणजे सगळा मोठा गोतावळा) जरा जास्त गडबड करणारा आहे...चलो जंगल में जाते है"...आम्ही काय? जंगल में म्हणजे किस झाड की पत्ती सारखं चला चला करुन बाकीच्या सगळ्यांना पुढे जायला दिलं आणि घुसलो उजवीकडे...
थोडा चढ होता पण शांतता होती...खरं तर बरं वाटत होतं..पावसाळ्यामुळे असेल बहुतेक पण पक्षीगण दिसले नाहीतच फ़ार पण हिरव्यागार जंगलातून मध्ये येणार्या वेलींना बाजुला करत कसे पुढे जात होतो कळतच नव्हतं...मध्ये पुन्हा एकदा ओढा लागला...आता जरा जरा भूकही लागली होती म्हणून पोटोबा केली..त्यादिवशी राकेशच्या आईने जवळजवळ सगळ्यांसाठीच मेथीचे ठेपले पाठवले होते त्यामुळे पहिले तर सगळे मुंगळ्यासारखे त्याच्याच डब्याच्या मागे धावले..नंतर मग इतरांनी आणलेल्या केळा वेफ़र्स, सॅंडविच, कुठे फ़ळ अशी सगळी भेळ पोटात गेल्यावर पुन्हा एकदा थोडं पुढे जाऊया असं ठरलं...मुख्य कारण एकतरी चांगलं सायटिंग झालं पाहिजे हे होतं आणि असं जेव्हा बर्याच परिघात पक्षी दिसत नाहीत तेव्हा काही वेळा एखाद्या ठिकाणी दोन-चार वेगवेगळ्या जातीचे पक्षी एकदम दिसायची शक्यता असते त्याला मिक्स हंटिंग पार्टी म्हणतात. तसलं काही असेल असं गाजर (अर्थातच जयेशनेच) दाखवल्यामुळे आगे बढोचा नारा होता......ती मिक्स हंटिंग पार्टी असायची तिथे असो पण आम्हाला काही दिसत नव्हती आणि अचानक कुणीतरी घड्याळ पाहायचा शाणपणा केल्यामुळे आता परत फ़िरायला हवंची जाणीव झाली...
परत ठिक आहे पण म्हणजे कुठे?? डावीकडे, ऊजवीकडे की सरळ मागे?? या मिक्स हंटिंगच्या शोधात कुणालाही दिशेची जाणीव होत नव्हती...पहिले उजवीकडे जाऊन पाहिलं तर वेलींची गर्दी वाढतच होती..शिवाय चढ आल्यासारखं वाटलं...नाही नाही चुकलंय...मग डावीकडे गेलं तर तीच आधीची झाडं आणि त्याला लगडलेल्या वेली सगळं सारखंच....चकवा...रानभूल...मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आठवायच्या मनस्थितीत नसतानाही आठवले आणि सुनीलला म्हटलं अरे आपल्याला जरा भूलल्यासारखं झालंय आणि आता निदान अजून आत आत नको जाऊया..पावसाळ्यात काळवंडलेल्या आभाळामूळे अंधार लवकर पडतो आणि सिलोंड्यात वगैरे तर तो लगेच जाणवतो त्यामुळे आता अडकलो तर काय?? सगळीच जण थोडी थोडी घाबरली होती पण तरी एकमेका सहाय करुच्या तत्वाने शेवटी कसाबसा तो दुसर्यांदा मिळालेला ओढा मिळाला..मग तो पार केल्यावर बाकीच्या झाडं, तुटलेले ओंडके असं काहीबाही आठवून सिलोंडाच्या मुख्य ओढ्यावरुन एकदाचे ट्रेलवर आलो..
मूळचा ग्रुप कधीच घरी गेला असावा..सारं सिलोंडा चिडीचूप होतं..
एकदा रस्ता दिसल्यावर सगळीच जण पुनश्चः बडबड करायला लागले पण याआधीची दोनेक तासांची रानभूल एक वेगळाच थरारक अनुभव देऊन गेली आणि तेही चक्क मुंबईच्या नॅशनल पार्कात...
फ़ोटो..साभार डॉ.संगिता धानुका

Labels:
जंगल,
संजय गांधी नॅशनल पार्क
Wednesday, January 13, 2010
या नयनी मृग पाहिले मी...
थ्री इडियट्स पाहिल्यानंतर इंजिनियरींगचे दिवस आठवले..का माहित नाही पण मला इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष जवळ येईपर्यंत इतका कंटाळा आला होता कदाचित डिप्लोमामार्गे डिग्री हा द्राविडी प्राणायाम केल्यामुळेही असेल..पण शेवटी शेवटी मी कॉलेज लाइफ़ला पर्याय म्हणून माझा निसर्गभ्रमंतीचा ग्रुप असं केलं होतं..नंतर नोकरीला लागल्यावर ते जास्त बरं झालं कारण नोकरीतले कॉन्टॅक्स परत विकेन्डला?? बापरे कल्पनाच करवत नाही..तिथेही टिम-मिटिंग नाहीतर पिअर रिव्ह्यु असलं काहीतरी बोलत बसले असते..खरंच याबाबतीत मी फ़ारच नशीबवान आहे, त्यामुळे शेवटच्या वर्षापासून का होईना माझ्या दैनंदिन कामाशी संबंधीत नसलेल्या मित्र-मैत्रीणींबरोबर मी जंगलात जायला लागले..त्यामुळे मला ख~या अर्थाने ब्रेक मिळे. आमच्या ग्रुपमधले सगळे जण वेगवेगळे अभ्यास आणि कामं करणारे होते त्यामुळे जी काही बोलणी होत ती फ़क्त आम्ही त्यादिवशी काय पाहिलं किंवा तत्सम विषयावरचीच असत...असो नमनालाच घडा भरला तेलाने..काय आठवलं होतं बरं??? :)
हां...तर शेवटचं वर्ष...शेवटच्या वर्षाच्या तोंडी परिक्षा सुरू होत्या म्हणजे परिक्षा जवळजवळ संपल्याच होत्या..ग्रुपमधल्या बाकी एक दोन टाळक्यांनाही वेळ असणार होता म्हणून आम्ही प्रथमच संध्याकाळी नॅशनल पार्कला जायचं ठरवलं. आजवर जे काही जायचो ते सात वाजता भेटून मग दुपारपर्यंत भटका असंच. पण यावेळी थोडा बदल करायचा प्रयत्न होता.सर्वांनी ठरवलेली वेळ होती चार वाजेपर्यंत.
गेटवर चार वाजता परिक्षा संपवून जाणं मलाही सहज शक्य होतं.आमच्यापैकी जयेशकडे गाडी होती. मला वाटतं त्याच्या बाबांनी त्यांची जुनी फ़ियाट त्याला वापरायला दिली होती. ही गाडी नंतर आमच्या नॅशनल पार्कच्या बर्याच ट्रेल्समध्ये होती आणि नंतर नंतर तिला प्रत्येकवेळी एकदातरी धक्का मारायला लागायचा त्यामुळे आम्ही त्याला जयेशचा डब्बाच म्हणायचो. तो कधीमधी चिडायचा पण त्याचीच काय आमची सर्वांचीच ती लाडकी होती..बापरे ही पोस्ट म्हणजे आठवणींचं जंगल होणार आता...जाऊदे या ब्लॉगमध्ये तसंही सगळ्या आठवणींचीच स्पर्धा असणार आहे.
तर गाडी असल्यामुळे कान्हेरीपर्यंत जावं असा बेत होता. कान्हेरीच्या मागे डोंगर आहे तिथे एका ठिकाणी मोर दिसतात अशी पक्की माहिती पण होती आणि अजून सरता मे होता म्हणजे येणा~या पावसाळ्यासाठी मोर तिथं नक्की येणार या उद्देशाने आम्ही सहा जण गेटवर भेटलो. नितीन, आराधना, मी, जयेश, राकेश आणि मला वाटतं सुनिल (सहावा नक्की आठवत नाही) होतो. पुढे तीन मागे तीन असे आम्ही पार्काचं तिकीट काढून गाडी आत घातली. उन्हं अजून वर होती. माझ्या मामाकडे जाताना आम्ही रस्त्यात लागणा~या गावदेवीला नेहमी नमस्कार करूनच पुढे जातो तसंच नॅशनल पार्कमध्ये कुठेही गेलो तरी सिलोंडाला थोडं वळल्याशिवाय आमचं घोडं पुढे जात नाही.....यावेळी गेलो तर चक्क सगळ्यांनी नाही म्हटलं मला कारण तिथे आता सेफ़ नाही असं म्हणतात (एकतर फ़ॉरेस्ट ऑफ़िसरनी पकडलं तरी किंवा कुणा टारगट कंपुच्या तावडीत सापडलो तरी म्हणून बहुतेक...) पण म्हणजे तोपर्यंत तरी आम्ही सिलोंडाला आमचा पार्कदेव करुन ठेवला होता. त्याप्रमाणे गाडी बाजुला घेऊन सिलोंड्यात एक छोटी चक्कर मारली. एक-दोन बॅबलर्स काय ते दिसले पण बरं वाटलं. मग आता कान्हेरीत जाऊया म्हणून जरा लवकर निघालो कारण कायद्याप्रमाणे काहीतरी सहा वाजता पार्काच्या बाहेर पडायचं असतं असं म्हणतात. त्यातल्या त्यात कान्हेरीचा पहारेकरी त्यावेळेला जरा हिंडूनफ़िरून, हाकारे देऊन सगळ्यांना बाहेर काढतो. त्यामुळे थोडा वेळतरी तिथे मिळायला हवा होता.
सिलोंडातून बाहेर आलं की पुन्हा मुख्य रस्त्याला एक दोन मिनिटांत आपण पोहोचतो आणि मग संध्याकाळची जंगलाची शांतता सुरू झाली. आम्ही सगळीजणं अगदी शांतपणे ती अनुभवत पुढे जात होतो..खरंच विश्वास बसत नाही की आपण भारताच्या आर्थिक राजधानीतच आहोत, शहराचा गोंगाट अगदी एखाद मैल पलीकडे आहे आणि इमारतींचं जंगलही खूपच जवळ आहे. मेमध्ये पार्कातलं जंगल जरा हिरवळ कमी झाल्यामुळे रिकामं रिकामं असतं.रस्त्याच्या बाजुला नजर वळवली तर मिठी नदीचा ओहोळ आणि त्यापलीकडच्या झाडांतलं ब~यापैकी दिसतं. तसंच तेव्हाही होतं. गाडी मध्ये एक जंगल खात्याचा दांडी पाडून बंद करायल येईल असा गेट आहे (तिथे परत गाड्यांची तिकिटं तपासली जातात) त्याच्या जरा अलीकडे होती आणि मी डाव्या बाजुला बसते होते त्याच बाजुच्या झाडीमध्ये काहीतरी हालचाल मला दिसली. मी जरा जास्तच किंचाळून जयेशला गाडी थांबवायला सांगितलं. गाडी थोडी पुढेच गेली होती कारण काय झालंय कुणालाच कळलं नव्हतं.
मग गाडी जरा रिव्हर्सला घेतली तर माझ्यासारखेच सगळे आनंदाने चित्कारले..संध्याकाळच्या वेळी जंगलात चरायला आलेल्या ठिपकेवाल्या हरणांचा एक कळप रस्त्याच्या जवळपासच्या झाडीत जवळच होता. नीट पाहिले की एक शिंगावाला नर, चारेक माद्या आणि दोन छोटी पिल्लं होती. आम्ही गाडी जरा मागं लावली आणि मग आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये असलेल्या एकुलत्या एक दुर्बिणीने एकापाठी एक त्यांना गाडीमागे लपून बराच वेळ पाहून घेतलं. नितीनकडे कॅमेरा होता त्याने फ़ोटोही घेतले. त्यातल्या एका मादीचं थोडं आमच्याकडेही लक्ष होतं. पण एकतर इथल्या हरणांना थोडंफ़ार सवय असावी किंवा आमच्यापासून धोका नाही हे तरी जाणवलं होतं.
पुन्हा गाडीत बसताना माझं तरी ’आज मै उपर आसमान नीचे’ असं झालं होतं.. अरे कशाला का?? माझ्या आयुष्यात मी स्पॉट केलेला जंगलातला पहिलावहिला कळप...स्पॉटेड डिअर. बोरीवलीच्या नॅशनल पार्कात तशी ब~यापैकी आहेत. पण ती त्यांना असं मनमोकळं नैसर्गिकपणे पाहण्याची ही पहिलीवहिलीच वेळ.त्यावेळी अंगावर आलेले रोमांच आणि ती अत्यानंदता वेगळीच. जंगलात असे रोमांचक क्षण जितके जास्त वाट्याला येतात तितकं आपलं जंगलात भटकंती करायचं वेड अजूनच वाढतं. त्यादिवशी नंतर कान्हेरीला आम्हाला विशेष काही दिसलं नाही. मोरांचा पण नुसता आवाजच ऐकू आला.पण तरी परत जाताना प्रत्येकजण एका नव्या आनंदात होता. पार्कात संध्याकाळचं असंच अधुनमधुन यावं असं सर्वानुमते ठरलं. पुन्हा सारखं सारखं नाही पण अधेमधे गेलोही पण पहिल्या फ़ेरीच्या वेळी पाहिलेली हरिणं आणि तो आनंद आमच्यापैकी प्रत्येकाच्याच मनावर वेगळा कोरला गेला आहे.
कधीतरी दूरदेशी उदास बसले असताना मध्येच ग्रुपमधलं कुणीतरी स्क्रॅप करतं ’अगं आज स्पॉटेड डिअर दिसलं, तुझी आठवण आली’ की वरचा प्रसंग आपसूक डोळ्यापुढे उभा राहतो आणि पुन्हा ते थ्रिल अनुभवते अगदी ही पोस्ट लिहिताना वाटतंय तसंच.

वन्यजीव,
संजय गांधी नॅशनल पार्क
Friday, January 8, 2010
प्रथमा...
जंगल भटकंतीची आवड तशी माडगुळकर, चित्तमपल्ली आणि अशाच अनेक लेखकांच्या पुस्तकांप्रमाणे लागली पण प्रत्यक्ष मात्र कुठे जायचं, कसं जायचं आणि मुख्य म्हणजे कोणाबरोबर..(मुलगी असल्यामुळे हा यक्षप्रश्नच) हा मोठाच प्रश्न होता. पण सुदैवाने बहुतेक १९९७ मध्ये ठाण्यामध्ये ओवळा येथे एक पक्षिमित्र सम्मेलन भरणार होतं आणि त्याची फ़ी तशी परवडणारी होती. माझी एक मैत्रीण भारती जिला खरं पक्षीनिरीक्षणामध्ये तसा काही रस नव्हता पण मुंबईतल्या मुंबईत बदल म्हणून ती चटकन हो म्हणाली आणि त्या सम्मेलनाला तीन दिवसांसाठी सगळ्या अट्टल पक्षीमित्रामध्ये मी नवशिकीही सामिल झाले. आम्ही दोघींनी त्या सम्मेलनात जमेल तेवढी धमाल केली. मुंबईतल्या लोकांकडून त्यावेळी सारखं बी.एन.एच.एस. हे नावही ऐकलं आणि सारखं वाटलं की आपल्याला जर हे शास्त्रशुद्ध जमवायचं असेल तर हा हॉर्नबिल हाऊस शोधलंच पाहिजे..
त्यात काय मुंबई आहे घ्या पत्ता आणि शोधा असं इतकं सोपसं वाटणारं हे प्रकरण खरंखरं शोधायला मला मध्ये एक-दिड वर्षे तरी गेली.एकतर इंजिनियरिंगचं विचित्र श्येडूल (म्हणजे सुट्ट्यांच्या बाबतीत) आणि त्यात टाउन साईड म्हणजे त्याकाळात लांब कुठेतरी असंच एकटं कसं निघायचं, घरची सोडतील का असे सगळे प्रश्न तर होतेच आणि एकदा प्रयत्न केलाही होता पण चर्चगेटवरून कसं जायचं ते कुणी नीट सांगेना. त्यामुळे एकदा माझे एक आय.आय.टी. मधुन शिकलेले आणि आता स्वतःची छोटी फ़ॅक्टरी असणारे सर कम मित्र यांच्याबरोबर बी.सी.एल.ला जायचं झालं तेव्हा त्यांनी माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.
आणि खरंतर त्यांनी हॉर्नबिल हाऊस मला दाखवलं तेव्हा त्याला एक वळसा घातल्यावर माझं मलाच हसायला आलं कारण आपलं मुंबईचं ते प्रसिद्ध प्रिन्स ऑफ़ वेल्स म्युझियम आहे ना त्यांच्या बरोबर पाठीला पाठ लावून हे धनेशाचं घर आहे..म्हणजे खरंतर म्युझियमचाच भाग यांना वापरायला दिलाय. कुणी त्या ऍड्रेसमध्ये जर म्युझियमचा उल्लेख लॅन्डमार्क म्हणून केला असता तर मला त्या सरांना उगाच त्रास नसता द्यावा लागला. तर असो..शुभस्य शीघ्रम..लगेच त्यांची वार्षिक वर्गणी भरून छान छान पक्षी पाहायला जायचं अशी स्वप्न रंगवत घरी आले. हे बी.एन.एच.एस. शोधणे आणि त्यांची मेंबरशीप घेणे यासाठी माझ्या बाबांनी मला इतका छान सपोर्ट दिला की त्यांनी जर पाठबळ दिलं नसतं तर मग एक मुलगी, लांब पडतंय, काय सारखं सारखं जंगलांत अशा आईच्या प्रश्नांना मला अजिबात सांभाळता आलं नसतं....
तर एकदाचं बी.एन.एच.एस.चं पत्रक आलं ज्यात मला जमण्यासारखा एक नेचर ट्रेल होता बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कात (त्याला आता फ़क्त एस.जी.एन.पी.च म्हणतो आमचा ग्रुप म्हणजे काही नाही वेळ वाचतो कुठे भेटायचं हे सांगायला). ती ९९ च्या मान्सुनची सुरुवात होती त्यामुळे इंजिनियरींगच्या सुट्ट्याही सुरू होत्या. घरातून कुणी आडकाठी करायचा प्रश्न नव्हता कारण दिवसा ढवळ्या जाऊन दुपारी परत असं लिहिलं होतं..
उशीर नको म्हणून वेळेच्या आधीच गेटवर पोहोचले. माझ्यासारखाच गेटवर अजुन एक मुलगाही थांबला होता. इतर काही टोळकी आपापल्या कंपु मेंबरची वाट पाहात होती. होता होता बरीच टोळकी मध्येही गेली..अजुन काही डोकी एकत्र व्हायला लागली पण हे बी.एन.एच.एस. वाले कुठं आहेत काही कळेना म्हणून मग त्या पहिल्यांदी पाहिलेल्या मुलाला (तोही माझ्यासारखाच थांबला होता म्हणून) विचारलं की बाबा तू पण बी.एन.एच.एस. च्या ट्रेलसाठी आलास का?? हो..नशीब ग्रुपलीडर नाही तर कुणी ग्रुपवाला भेटला म्हणून त्याच्याच बाजुला थांबले. अगदी मोजकं आणि शक्यतो पक्षी आणि अशाच गोष्टींबद्द्ल बोलणारा माझा पहिला वहिला मित्र ’राकेश’ हा मला अशा प्रकारे भेटला. त्यावेळी अर्थातच तो फ़ार काही बोलला नाही पण ओळख झाली.त्यानंतर थोड्या वेळाने एका मुलीने माझ्याशी ओळख करून घेतली ही आमची "आराधना".मग असेच अजून जयेश, नील, लोऑन आणि काही लोकं गोळा व्हायला लागले...आम्ही बरेच जण बी.एन.एच.एस.साठी प्रथमच येत होतो... तर राकेशने, आता याचा राक्या झालाय...इतर एक-दोन टोळक्यांना विचारून ट्रेलमधले बाकी सवंगडीही गोळा केले पण पत्यातले भिडू गोळा झाले पण हुकुमाच्या एक्क्याचा पत्ताच नव्हता. मग कुणीतरी जुन्या मेंबरने कुठे कुठे फ़ोन करून आम्हाला माझ्यासाठीची दुःखद बातमी दिली की काही कारणाने ग्रुप लीडरला येता येणार नाही म्हणून मग ट्रेल कॅंसल...श्या काय बी.एन.एच.एस. आहे?? मी आणि माझ्यासारखे बरेच नवशिके म्हणाले.." इनका आजकल ऐसे होता है" अजून एक नकोशी कॉमेन्ट...आयला कुठल्या मुहुर्तावर जॉइन केलं?? घरी जाऊन पोपट..माझा आणि बाबांचा..
पण इतर काही जणांच्या सुपीक डोक्यातून आता आलो आहोत तर स्वतःच जाऊया म्हणून कल्पना आली आणि चला चला म्हणून आम्ही एकदाचे नॅशनल पार्कमध्ये घुसलो...आधी शाळेत असताना आलेलं नॅशनल पार्क म्हणजे आठवतही नव्हतं कसं जायचं, कुठे काय पण नेहमी येणार्या मंडळींमुळे हा प्रश्नच पडला नाही. सरळ कान्हेरीच्या रस्त्याला चालायला लागायचं आणि मग जे ज्या ज्या क्षेत्रात रस घेणारे होते त्यांनी त्यांचं जंगल नॉलेज नवशिक्यांना वाटायला सुरूवात केली. कुणी झाडांची माझ्या डोक्याच्या संपुर्ण वरुन जाणारी (अजुनही ती नावं वरूनच जातात पण जाता जाता आधी ऐकल्याचं ओळखीचं हसू देऊन जातात) नावं, कुणी किटकांची लांबलचक नाव देतंय..मी बापडी स्वतः चुपचाप राहून चालत होते..अहो तोंड उघडण्यासारखं काही माहित पण असायला हवं ना??
नशीब त्यातल्या त्यात गेटजवळचा नेहमीचा (नेहमीचा आता तेव्हा अरे वा शुभ आणि यॉंव..)भारद्वाज दिसला. तसंच, पार्कातल्या छोट्या तलावात डॅब-चीक, हेरॉन, मुरहेन, खंड्या असे पक्षीगणही दिसले होते त्यामुळे माझं पक्ष्यांबद्दलचा रस वाढत होता..आमच्या पैकी आराधनाला झाडांबद्दल खूपच माहिती होती आणि राकेश आणि जयेश पक्ष्यांना पटापट ओळखत होते. आपण खूप बच्चू आहोत असं जरी वाटलं तरी ते माहित होतं आता फ़क्त योग्य संगत मिळावी आणि देर ही सही पण आपल्या आवडीला जोपासावं यासाठी हा ट्रेल आमचा आम्ही केला ते माझ्यासाठी खूपच बरं होतं.
कदाचीत जो कुणी लीडर होता त्याने नेलं असतं आणि मग हवं तसं थांबता नसतं आलं किंवा त्याने फ़क्त झाडं किंवा किटकच दाखवले असते तर?? अर्थात तसं होत नाही पण उगाच या सगळ्या तेव्हाच्या कुशंका....त्यानंतरच्या ट्रेलमध्ये कळलं की ही वरची पक्ष्यांची यादी तर नॅशनल पार्कातल्या पहिल्या दहा मिन्टांत होतेच पण खरे पक्षी नंतर आत आत गेले की दिसतात. असो. तर त्या दिवशी मग दुपारी काही जण कान्हेरीपर्यंत पुढे गेले. मी मात्र घडाळ्याच्या हिशेबाने आराधनाबरोबर परत फ़िरले. परतीच्या वाटेवर माझ्याकडे या जंगल जगात माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले आणि माझ्या दैनंदिन जिवनाशी अजिबात निगडीत नसलेले अनेक नवे मित्र मला मिळाले होते.
आता यापुढे आपणही असंच त्यांच्यासारखं चांगली दुर्बिण (जेव्हा जमेल तेव्हा घेऊन) मस्त पक्षी पाहात रानोमाळ हिंडणार या विचारानेच परतीचा रस्ता कधी संपला आणि पुन्हा एकदा ट्रेनच्या गर्दीत कधी शिरलो कळलंच नाही. ये पुढच्या वेळी नक्की फ़ोन करुन ठरवू हं?? आराधनाला टाटा करताना म्हणत होते..माझ्याकडे स्वतःचा फ़ोन नंबर नसल्याचं मला प्रथमच इतकं वाईट वाटत होतं....
या छोट्या ट्रेलमुळे मिळालेले माझे हे मित्र मी भारतात असेपर्यंत जंगल भ्रमंतीसाठी कायम सोबतीला होते आणि आता जाते तेव्हाही मला पुन्हा त्या जगात घेऊन जातात.आणि त्यामुळे त्यादिवशीचा बी.एन.एच.एस.चा जो कुणी टिम लीडर होता तो न आल्याबद्दल या पोस्टमध्ये त्याचे खास आभार.