RSS

Thursday, September 6, 2007

तानसा अभयारण्याची व्यथा

"मन वढाय वढाय निसर्गापाशी वाहून जाय।" पावसाळा ऋतूच असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण निसर्गाकडे धावतो. आणि या अशा हिरव्यागार निसर्गरम्य जागांमध्ये प्रत्येकाचे आवडीचे एखादे स्थळ असते. तानसा अभयारण्य ही माझी अशीच एक प्रिय जागा.मुंबईसारख्या महानगराची पाण्याची तहान भागवणारा तानसा तलाव कुणाला माहित नाही? पण त्याभोवती असणार्या अभयारण्याची व्यथा ठाऊक असणारे फार थोडे असतील.

२००५ च्या पावसाळ्यात आटगावमधून जेव्हा आम्ही तानसाच्या एका बाजुला पक्षिनिरीक्षणासाठी निघालो तेव्हा ......

मान्सुनमध्ये आगमन करणारे आणि तानसाच्या दर्याखोर्यात किलबिलाट करणारे पक्षी पाहताना खरं तर पायाखाली जास्त लक्षही जाणार नाही. पण फक्त पावसाळ्यात येणार्या आणि तात्पुरत्या राहणार्या काही वनस्पती पाहता पाहता एका करंजेच्या झाडाच्या बुंध्याला खालुन चक्क तीन काळी भोके दिसली. जवळून पाहिले तर झाड आतुन पद्धतशीरपणे जाळुन पोखरले होते म्हणजे काही दिवसात त्या झाडाचा नैसर्गिक मृत्यु (?) निश्चित होता.

प्रथमदर्शनी हा एखाद्या विजेचा प्रताप (बुंध्यालाच?) असावा असे वाटून आम्ही थोडे पुढे गेलो आणि अक्षरशः मन हेलावून जाईल असे दॄश्य दिसले भरपूर झाडांची हीच गत दिसली
ही सर्व खोडे अशी जळलेली का याचा कायद्याने विचार केला तेव्हा असे आढळले, की भारतीय निसर्गसंवर्धन कायद्याने दिलेली एक सूट आहे. त्यानुसार सुकलेले लाकुड जंगलाच्या बाहेर न्यायला प्रतिबंध नाही. झाडाला पद्धतशीरपणे जाळून हळुहळु जंगलातच त्याचे ओंडके बनवून अवैध निर्यात होते.उन्हाळ्यात कॄत्रिम वणवे लावून जंगल नष्ट होते आहे. पावसासाठी झाडांच्या अस्तित्वाची गरज ही काही आता संशोधनाची गोष्ट राहिली नाही. ज्या प्रकारे नवीन झाडे लावण्याची (विशेष करुन पावसाळ्यात) मोहिम दिसते तीच हौस, असणार्या झाडांचे संवर्धन करताना का दिसू शकत नाही? ही जंगलहानी थांबवण्यासाठी आपण काहीच का करू शकत नाही ही विषण्णता मनात घेऊन मी परत मुंबईत परतले.

जर खरंच यासाठी काही करता येणार असेल का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न.

5 comments:

दिपक said...

निसर्गवेड म्हणतात ते यालाच.. खरच तुझी तळमळ तुझ्या लिख़ाणातून कळते.. अजुन असेच उत्तम काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा करतो..खूप खूप शुभेच्छा!..:)

HAREKRISHNAJI said...

येवढा चांगला ब्लॉग का बरे असा ओकाबोका ? त्याला पालवी केव्हा फुटणार ?

अपर्णा said...

हरेक्रिश्नजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल....माझा प्रयत्न होता की मी माझ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी या ब्लॉगवर टाकेन...आणि मध्येच मी माझिया मना चालु केलं..हे म्हणजे जुळी मुलं सांभाळण्यासारखं कठिण...पण जरा नीट आठवणी झाल्या की इथे पण थोडी हिरवळ येईल....

priyadarshan said...

प्रश्न तोच. हा ब्लॉग असा वैराण का ?

अपर्णा said...

येत्या वर्षात नक्की प्रयत्न करेन प्रियदर्शन....